मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

भिशीचे आमिष जळगावातील १३ महिलांना पडले महागात

mnewsmarathi प्रतिनिधी
February 22, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

शहरातील १३ महिलांना भिशीचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांना गंडवल्याची घटना उघड झाली आहे. भिशीसाठी पैसे गोळा करण्यासह सासर्‍याच्या उपचारासाठी पैसे उसनवार घेऊन दाम्पत्याने १३ महिलांची फसवणूक केली. सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे अशी संशयित दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी ठोसर या शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील योजनानगरात वास्तव्यास आहेत. त्याच भागातील सविता सोळंखे आणि संजय सोळंखे या दाम्पत्याशी पल्लवी यांची दीड वर्षापूर्वी परिचय झाला. सविताने खासगी भिशी सुरू केली. त्यात परिसरातील महिलांनाही आमिष दाखविले. सप्टेंबरमध्ये सविताने पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवून पल्लवीकडून ५० हजार रुपये घेतले. नंतर हळूहळू काही रक्कम देऊन पल्लवी यांचा विश्‍वास संपादन केला.

योजनानगरातील इतर महिलांकडून दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने सविता ही रक्कम गोळा करत असल्याची माहितीही पल्लवी यांना मिळाली. नंतर सविताने काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्ज काढले. सोळंखे दाम्पत्याने पल्लवी यांना जादा पैसे परत करण्याचे आमिष दाखवून १३ लाख ४६ हजार २०० रुपये घेतले. तसेच काही महिलांकडूनही सुमारे ४१ लाख ७६ हजार ८० रुपये जमा केले. काही दिवसांनी पल्लवी यांनी सविताला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पैशांसाठी पल्लवी यांनी सविताच्या घरी चकरा मारल्या. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर आपल्यासह इतर महिलांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पल्लवी यांनी थेट जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून सविता सोळंखे व तिचा पती संजय सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अनंत अहिरे तपास करीत आहेत

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा