• Home
  • माझा जिल्हा
  • बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर
Image

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026