शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात यावा असा न्यायालयाचा आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास विकास अधिकारी हे गैरहजर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले त्यामुळे मी आज दिनांक 28.11/2022 रोजी पंचायत समिती बारामती येथे विनंती अर्ज केला आहे संबंधित विभागाने अर्जावरती कारवाई न केल्यास. अथवा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अभय दिल्यास येणाऱ्या दिवसा मध्ये बारामती पंचायत समिती या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याची माहिती प्रदीप ( दादू) मांगडे यांनी दिली.
संबंधित विभागामार्फत खरंच अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार? की इलेक्शन ड्युटी च्या नावाखाली पाठराखण केली जाणार? अशी चर्चा बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे.