प्रतिनिधी.
दि.४/३/२०२४ रोजी रात्री १ वा सुमारास ढालेवाडी गावच्या हद्दीत संतोष सुभाष राठोड रा. ढालेवाडी ता.पुरंदर जि.पुणे ही व्यक्ती नाझरे धरणाच्या शेजारी परदेशी यांच्या शेतात विहिरीजवळ झाडाच्या झुडपाच्या आडोशाला दारू तयार करनारी भट्टी जेजुरी पोलिसांना आढळून आले .
त्याठिकाणी मिळून आलेल्या माल खालीलप्रमाणे
१) ३.५०.००० रू २ लोखंडी पातले त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे १०.००० लिटर कच्चे रसायन
२) १.२२.५०० रू ३५ लिटर मापाचे निळे काळे रंगाचे प्लॅस्टीकचे ३५ कॅन्ड त्यामध्ये १२२५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू कि.अं
३)२.५०० रू चे १० मन लाकडी सरपण
४) ४८.००० रू काळा गुळ १० किलो वजनाच्या सुमारे १२० टेपा एकुण १२००किलो वजनाच्या कि.अ
५) २०० रू चा एक जर्मनचा चँटु त्या नळी असलेला कि. अं.
६) १००० रू चा एक जर्मनची थाळी
असा एकूण
५.२४.२०० रू चा मुद्देमाल आढलूनला असून माल जप्त करण्यात आला आहे .
मिळालेल्या मालातून हातभट्टी तयार करणाऱ्या रासायनिक कच्चा माल व सरपण तेथेच नष्ट करण्यात आले आहे . संतोष राठोड याच्यावर जेजुरी पो कॉ प्रवीण शेंडे यांनी
भा. द. वी.कलम ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास प्रभारी अधिकारी डी. बी. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोसई काटे हे करीत आहेत .