बारामती.मेंढपाळ कुटुंबाच्या मेंढ्यांच्या कळपावर लांङग्यांचा हल्ला, हल्ल्यात दहा मेंढ्या ठार.

Uncategorized

एकीकडे जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्यामुळे मेंढपाळांची मोठ्या प्रमाणावर फरपट होत आहे. स्वतः जगाव की पशुधन जगवावं या विवंचनेत मेंढपाळ असतानाच लांडग्याच्या कळपाने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून दहा मेंढ्या ठार झाल्याची घटना समोर आली.
शेंङकरवाङीतील मेंढपाळ दादा महानवर, व तान्हूबाई महानवर यांच्या मेंढ्या खंङू भिवा लकङे यांच्या शेतात बसणी करीता आहेत. रात्री 2 वाजता चार लांङग्यांनी त्यांच्या मेंढ्यांच्या कळपावर त्यांच्या समोर हल्ला केला.या कुटुंबाचे पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले आहे..या कुटूंबाला नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी.अत्यंत हलाखीत आपला उदरनिर्वाह महानवर कुटूंब करित आहे. पशुवैद्यकीय अधिकारी रूपाली जाधव, वनपाल चौधरी,वनरक्षक काळे मॅङम, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड, रासकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर, तुषार शेंङकर, तुषार साठे, भाऊसाहेब लकङे आदींनी घटना स्थळावर जाऊन महानवर कुटूंबाची भेट घेऊन संबंधित अधिकारी मंङळींशी संपर्क केला.