• Home
  • क्राईम
  • कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला
Image

कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला

प्रतिनिधी

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

कळवा येथील पारसिक नगर परिसरात पोलीस अधिकारी राहातात. ते मुंबई पोलीस दलात साहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या परिसरातील सार्वजनिक रस्त्याकडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले. शनिवारी सकाळी ते दुचाकी धुण्यासाठी इमारतीखाली उतरले. त्यावेळी त्यांना रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने देखील त्यांची दुचाकी कारवाई करून नेली नव्हती. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026