• Home
  • क्राईम
  • धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक सापळ्यात; मठाच्या गुप्त दानपेटीतील रक्कम काढून देण्यासाठी लाच
Image

धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक सापळ्यात; मठाच्या गुप्त दानपेटीतील रक्कम काढून देण्यासाठी लाच

प्रतिनिधी

गुप्त दान पेटी उघडून रक्कम न्यासच्या विश्वस्तांना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील वर्ग-३ च्या निरीक्षकाविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेताना पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान सापळा लावण्यात आला होता.

दीप दौलतराव बागुल (वय ३९, रा. रामगोपालनगर, छत्रपती संभाजीनगर), असे लाच मागणाऱ्या निरीक्षकाचे नाव आहे. दीप बागुल याने कन्नडमधील कालीमठ न्यासच्या (उपळा) गुप्त दान पेटीतील रक्कम विश्वस्तांना देण्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. पंचांसमक्ष सोमवारी दीप बागुल लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.

Releated Posts

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025