• Home
  • माझा जिल्हा
  • *अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन*
Image

*अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन*

 प्रतिनिधी

: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ११ ऑक्टोबर २०२३ पासून https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीमध्ये संकेतस्थळावर भरून त्याची प्रत संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावेत.

महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी घ्यावी. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर ५ हजार ४३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आहे.

विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026