• Home
  • क्राईम
  • छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा
Image

छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रीतीचे वडील मोहन विष्णू मते (वय ४७, रा. पार्थ रो हाऊस, आडगाव, जि. नाशिक) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रीतीचा संजय शिंदे याच्याशी डिसेंबर २०२१ मध्ये विवाह झाला होता.

संजय खासगी कंपनीत कामाला आहे. विवाहानंतर किरकोळ कारणांवरुन तिचा छळ सुरू करण्यात आला. तिला टोमणे मारण्यात आले. छळ असह्य झाल्याने तिने ओढणीने गळफास घेतल्याची घटना वाघोलीतील राहत्या घरात घडली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026