मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

mnewsmarathi 24 Mar 2024 1 मिनिट वाचन 8,551 वाचन

प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करण्यात आला. घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ, तसेच तिचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका २० वर्षीय तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वास राजेंद्र ताकतोडे (वय २५), सासरे राजेंद्र माणिकराव ताकतोडे (वय ६०), दीर ओंकार राजेंद्र ताकतोडे (वय २२) सासू महानंदा ताकतोडे (वय ५०), नणंद विद्या कांबळे (वय २५, सर्व रा. सिंहगड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास ताकतोडे याने तरुणी अल्पवयीन असताना तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी विवाह करणार आहे, असे सांगून २०१९ मध्ये विश्वासने येरवडा भागातील घरातून तरुणीला फूस लावून पळवून नेली. त्यावेळी तरुणी १६ वर्षांची हाेती. ती अल्पवयीन असल्याचे माहित होते. विश्वासने तिच्याशी विवाह केला. त्यावेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. विश्वासने तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती झाली. तरुणीच्या आईचे घर येरवडा भागात आहे. घर नावावर करून देण्यासाठी तिचा छळ केला. पती, सासरा, दिराने मारहाण केल्याने गर्भपात झाला. तिला जाळून मारण्याची धमकी देण्यात आली, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. कांबळे तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi