मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

mnewsmarathi 29 Mar 2024 1 मिनिट वाचन 9,137 वाचन

प्रतिनिधी

दांडेकर पूल भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्राना मारहाण करण्यास आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टोळक्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मयूर राम पालखे ( वय.२५, रा.दांडेकर पुल) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मादास कदम, चंद्रकांत कदम निलेश कदम, अनिल लोंढे आणि साथीदारांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर हा पुणे महापालिकेत कामाला आहे. त्याचे वडील राम पालखे सामाजिक कार्यकर्ते असून त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मयूर बुधवारी रात्री घरी निघाला होता. त्यावेळी आरोपीचा नातेवाईक असलेल्या एकाने त्याला धक्का दिला. मयूरने जाब विचारला. त्यानंतर आरोपी धर्मादास कदम आणि नातेवाईक एकत्र आले. त्यांनी मयूर यांना कोयता मारला आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi