• Home
  • क्राईम
  • रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Image

रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत पोलीस हवालदाराने आरोपीच्या पत्नीवर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय आतकुलवार यास अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. हवालदार आतकुलवार विविध अवैद्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली करीत असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे.

पतीला एका प्रकरणातून वाचवण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्या मोबदल्यात आतकुलवार याने वर्षभर शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. तसेच वारंवार ‘व्हिडीओ कॉल’ करून धमकी देत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी तपासाला सुरुवात केली. गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस हवालदार संजय आतकुलवार यास बुधवारी अटक केली.

हवालदार आतकुलवार हा विविध अवैद्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतला असल्याचे आता बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026