कोऱ्हाळे बु. येथे प्रतिबंधित गुटखा अन्नपदार्थ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ने केला जप्त.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

कोऱ्हाळे बु. येथे भाग्यवान किशन चव्हाण या नावाच्या इसम कोऱ्हाळे बु. गावचे हद्दीत समता नगर जाणारे रोडच्या कडेला असलेल्या अमोल स्टोअर्स नावाच्या टपरीमध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करत असल्याचे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आढळून आले . भाग्यवान चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधित आदेश क्रमांक अधिसूचना 369/ 7 दि. 15 /7/ 2020 चे उल्लंघन करून सदर आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 /7/2020 पासून पुढे एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला किंवा अंतिमता गुटखा किंवा पान मसाला गठीत होऊ शकेल असा पदार्थ सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादी उत्पादन/ साठा /वितरण /वाहतूक /तसेच विक्री यावर बंदी घातलेली असताना देखील सदरचे अन्नपदार्थ हे असुरक्षित दर्जाचे असल्याने शासनाने त्यावर प्रतिबंध केला आहे. मुक्त प्रतिबंधित अन्नपदार्थ हे आरोपी भाग्यवंत किसन चव्हाण वय. 40 वर्षे रा. कोराळे बु. ता. बारामती जि. पुणे यांला वडगाव निंबाळकर पोलिसांनी विचारले कोणाकडून खरेदी केले याबाबत त्यानी कोणत्याही ठोस माहिती दिली नाही. सदर प्रतिबंधक अन्नपदार्थ हे कोणाकडून खरेदी केली याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना दिशाभुली करणारी अशी उत्तरे दिली. यावरून राहुल बाळासाहेब भाग्यवंत यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये भाग्यवान किसान चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 179 ,188, 273 ,328 सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलमांनुसार फिर्याद दाखल करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ने आरोपीला अटक करून. 19514 रुपयाचा किमतीचा गुटखा माल जप्त केला आहे . पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत.