• Home
  • क्राईम
  • ओदिशातून पाठविण्यात आलेला दोन कोटींचा गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची सोलापूर जिल्ह्यात कारवाई
Image

ओदिशातून पाठविण्यात आलेला दोन कोटींचा गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची सोलापूर जिल्ह्यात कारवाई

प्रतिनिधी

ओदिशातून महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात आलेला दोन कोटी २० लाख रुपयांचा गांजा केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. सोलापूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंगपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. ओदिशातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. गांजा पाठविण्यात आलेल्या ट्रकची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा लावून ट्रक अडविला. ट्रकची तपासणी करण्यात आली. तेव्हा ट्रकमध्ये गांजा आढळला, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली.

सुधीर चव्हाण गांजा आणण्यासाठी ट्रक घेऊन ओदिशात गेला होता. गांजाची सोलापूर जिल्ह्यात विक्री करण्यात येणार होती. सोलापूरमधून गांजा राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विक्रीस पाठविण्यात येणार होता. गांजा विक्री, तसेच तस्करी प्रकरणात आणखी कोण सामील आहे का ?, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वनगे यांनी दिली.

गांजा बाळगणे, तसेच विक्री करणे अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात ट्रक अडविला. तेव्हा गांजाचा वास येऊ नये म्हणून कोंबड्यांची विष्ठा पोत्यांमध्ये भरण्यात आल्याचे उघडकीस आले.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026