परमात्म्याच्या प्रकृतीचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी

माझा जिल्हा

प्रतिनिधी

पर्यावरण दिनानिमित्त निरंकारी मिशन आणि लोणावळा नगरपरिषदेच्या तर्फे लोणावळा- खंडाळा येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान होणार संपन्न

            मानवाने नेहमीच स्वत:च्या विकासासाठी प्राकृतिक संसाधनांचे शोषण केले असून त्याचा परिणाम म्हणून आज आपण पर्यावरणाचा ऱ्हास होताना पाहत आहोत. या हानीपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी ५ जून या दिवशी ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित केला जातो.

            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन बुधवारी ५ जून रोजी संपूर्ण भारतवर्षातील पर्वतीय पर्यटन स्थळांवर विशाल वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संकट उभे ठाकले असताना एका बाजुला प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी संपूर्ण मानवजात एका मंचावर एकत्र येत असताना निरंकारी मिशन आपल्या या अभियानाच्या माध्यमातून युवापिढीला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे जे नि:संदेह उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन चे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण आणि संबंधित शहरातील रहिवासी एकत्रितपणे या महाअभियानाचा भाग बनणार आहे ज्यायोगे प्रकृतीच्या संरक्षणार्थ एक अर्थपूर्ण लक्ष्य गाठले जाऊ शकेल.

             संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की निरंकारी मिशन वर्ष २०१४ पासूनच संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम‘ या पर्यावरण कार्यक्रमाच्या थीमनुसार ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित करत आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण भारतवर्षातील १८ पर्वतीय पर्यटक स्थळांवर, ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तराखंड मधील मसूरी, ऋषिकेश, लैंसडाउन, नैनीताल, चकराता, भवाली; हिमाचलप्रदेश मधील शिमला, मनाली, धर्मशाला; गुजरातमधील सापुतारा; महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पांचगनी, खंडाळा, लोनावळा, पन्हाळा, सोमेश्वर; सिक्किम येथील गीजिंग शहर आणि कर्नाटकच्या नंदी हिल्स अशा पर्वतीय स्थळांचा समावेश आहे.

            या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येईल ज्यामध्ये सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन सर्वप्रथम निराकार प्रभूची प्रार्थना करतील ज्यायोगे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावा. त्यानंतर मिशनचे युवा स्वयंसेवक ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयावर नाटिकांचे सुंदर सादरीकरण करतील आणि पर्यावरण संकटाच्या प्रति जनजागृती करतील. तसेच सर्व स्वयंसेवक हातामध्ये पर्यावरण रक्षणविषयक घोषणाफलक व बॅनर्स उंचावून मानवी साखळी निर्माण करतील.