बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई टिपर चोरीच्या २ गुन्हेगारांना २४ तासाचे आत केले अटक

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील वडगाव निंबाळकर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतील गालींदे यांचे पेट्रोल पंपातील मोकळे जागेतुन दि.१९/०८/२०२४ रोजी रात्री ११:३० ते २०/०८/२०२४ रोजी सकाळी ०७:०० वा चे दरम्यान लालासाहेब पंडीतराव दरेकर रा वडगाव निंबाळकर ता. बारामती यांनी त्यांचे मालकीचा टिपर टाटा कंपनीचा १६१८ एल.पी. के हायवा ट्रक नं एम.एच. १७ बी. वाय. ६२९६ हा चोरी झोलेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३४/२०२४ भा. न्या.सं. ३०३(२) प्रमाणे दि.२०/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुनहयाचे तपासात गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे चोरीस गेलेले टीपरचा शोध घेतला असता सदरचा टिपर हा सालपे ता. फलटण जि. सातारा गावचे हददीत पाठलाग करून पकडला असुन सदर टिपर सोबत इसम नामे १) निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, २) नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता. फलटण जि. सातारा हे दोघे मिळुन आले . त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर टिपर चोरी केलेचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी १) निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, २) नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता. फलटण जि. सातारा यांना अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, महेश पन्हाळे, अनिल खेडकर, पो. ना भाउसाो मारकड, कुडलीक कडवळे, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, नागनाथ परगे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा महेश पन्हाळे हे करीत आहेत.