प्रतिनिधी – फिरोज भालदार
महाराष्ट्रामध्ये महिला / मुली यांच्यावर वाढत्या अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे , आंदोलन , काढले जात आहेत . याच अनुषंगाने खंडाळा तालुक्यातील शिरवळ यथे महीलांनी अत्याचाराचा विरोधात सर्व महिलांनी एकत्र येऊन शिरवळ गावातून रॕली काढण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात महीला सुरक्षेसाठी आंदोलन केले .
महाराष्ट्र मधील महिला / मुलिंवर्ती जो अन्याय अत्याचार होत आहे याला कुठेतरी आळा बसावा यासाठी शिरवळ पोलीस स्टेशन येथे महीलांना सुरक्षा मिळावी व महिला अत्याचाराविरुद्ध प्रशासनाने कडक कायदा आमलात आणावा यासाठी निवेदन देण्यात आले . आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व महीला कुठल्याही संघटना किंवा राजकीय पक्षांशी संबंधित नसून महीलांना न्याय सुरक्षा मिळावी यासाठी स्व:ता स्वयंप्रेरणेने बाहेर पडून या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या .
या आंदोलनामध्ये सौ. उज्वला तांबे ,अंबिका देशमाने, उज्वला साठे ,शैला जावळे ,दिपाली जगताप ,छाया अडसूळ,अलका नेवसे ,अंबिका पवार,माधुरी मांढरे,शैला सोनवणे ,सीमा तावडे,विद्या निवळकर ,पूजा जगताप,संगीता सिंग ,पार्वती बिराजदार ,अनिता माने ,आशा कुरलेकर ,श्रद्धा वाघ,आशा पवार,ज्योती तायडे ,सरोजा राऊत आदी महिला उपस्थित होत्या.