• Home
  • माझा जिल्हा
  • अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य कोचिंग
Image

अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य कोचिंग

प्रतिनिधी.

स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोचिंग घेता यावे, या उद्देष्याने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कोचिंग केंद्रीय योजना अमलात आणली जात आहे. याअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब अनुसूचित जाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य देण्यात येत आहे. मात्र अशीच समान विशिष्ट योजना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नाही.या योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांची निवड़ केंद्रीय स्तरावर गुणवत्ता आधारावर केली जाते आणि लाभार्थी विद्यार्थ्यांना विभागाकडून थेट लाभ हस्तांतरणा द्वारे निधी वितरित केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारतातील कोणत्याही ठिकाणी त्यांच्या पसंतीचे कोचिंग केंद्र निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. सध्याच्या घडीला, मध्यप्रदेशसह देशात कोणत्याही ठिकाणी या योजनेंतर्गत कोणत्याही संस्थेला सूचीबद्ध करण्यात आलेले नाही.ही केंद्रीय योजना असल्याने तिची अमलबजावणी विभागाकडून थेट होत आहे. राज्यनिहाय निधी वितरणाची कोणतीही तरतूद या योजनेंतर्गत नाही.केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांनी आज राज्यसभेत ही माहिती एका लेखी उत्तरात दिली.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026