• Home
  • माझा जिल्हा
  • नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Image

नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

प्रतिनिधी

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र

मुंबई, दि. 7 डिसेंबर 2022 :विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकरात सुरू करावी अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणार्‍या सध्या 22 रेल्वे गाड्या असल्या तरी 575 किमि चे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदीया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयी करता नागपूर हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026