गोवंशाची वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

फिर्यादी नंदकुमार बापूराव गव्हाणे पोलीस कॉन्स्टेबल माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादिवरुन दोन अनोळखी व्यक्ती हे दि. 8/ 12/ 2022 रोजी सकाळी 11 वा. वाजण्याच्या सुमारास मोजे जळगाव क. प गावाच्या हद्दीत जळगाव सुपा रोडवर क-हा नदीचे पात्रालगत चालू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामा शेजारी या ठिकाणी 2 अनोळखी व्यक्ति त्यांच्यापाशी महिंद्रा कंपनीचे पिकप वाहन क्रमांक एम. एच. 12 जी.टी 3508 ह्या गाडीच्या लगत उभे असलेले 2 अनोळखी व्यक्ती ही पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले . व त्या गाडीची तपासणी केली असता त्यात साधारण 2 ते 6 महिने वयाची काळे बांडे , तांबडे, पांढरे रंगाची एकूण 16 गोवंशाची वासरे व जुना विवो कंपनीचा मोबाईल एकूण सरास 4,00,000/ रु चा माल आढळून आला. माळेगाव पोलिसांनी हा गाडी व गाडीतला माल जप्त केला आहे . गौवंशाच्या कत्तलीस मनाई असल्याचे माहित असताना देखील शेतकऱ्यांकडून त्याची बेकायदेशीर पणे खरेदी करून ते कत्तलीसाठी नेताना माल मिळून आलेले आहे . फिर्यादीच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध व वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. डी .पी सानप हे करीत आहे .