• Home
  • क्राईम
  • संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार
Image

संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी

जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी सात जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणी एकूण आरोपींची संख्या आता ११ झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती), जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चार आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सात आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील नववीत शिक्षण घेणार्‍या दोन अल्पवयीन मुली १४ सप्टेंबर रोजी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या दोघी हडपसर या ठिकाणी आल्यावर, आरोपी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी पीडित मुलींनी संपर्क साधला. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना सांगितले की, रूमवर दोन मुली आल्या आहेत. त्यानंतर त्याचे तीन मित्र रुमवर आले आणि त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारु पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026