प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अकीत करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील मौजे सोरटेवाडी ता. बारामती जि.पुणे येथील एका महिला तकारदार यांचे दिनांक ८/१२/२०२२ रोजी सकाळी ११.३० वा. चे सुमारास दोन अनोळखी तरुणांनी भांडी, चांदीचे सोन्याचे दागीणे स्वच्छ करुन देतो असे म्हणुन हातचलाखी करून त्यांचे ९२,४००/- रुपयांचे सोन्याचे दागीण फसवणुक करुन घेवुन गेलेबाबत सहा पोलीस निरीक्षक श्री लाडेसाहेब यांना फोनदवारे माहिती मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक लांडे साहेब यांनी तात्काळ पोलीस स्टेशन हददीत ठिक ठिकाणी पेट्रोलींग व नाकाबंदी नेमली त्या अनुशंगाने निरा मोरगाव रोडवर मौजे चौधरवाडी गावचे हददीत पो. हवा. खेडकर ब.नं १७९७, पो.ना. भोसले ७९७ पो.कॉ जाधव बंनं ४८. पो.कॉ सागर वाघमोडे असे नाकाबंदी करीत होते
सदर नाकाबंदी करीत असताना दुपारी १२:०० वा. चे सुमारास इसमनामे आकाशअरविंद भोले वय २३ वर्षे, रा. अहेरवरेगाव ता. गेवराई जि.बिड हा त्याचे ताब्यात होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल नं एम.एच.१५/ एच.एफ / २३०६ हिवेसह मिळुन आला त्यास सदरची मोटार सायकल कोणाची आहे? तीचे मालकाचे नाव पत्ता व कागदपत्राबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे देवुन काहीएक समाधानकारक माहिती दिली नाही. यावरुन सदरची मोटार सायकल ही त्याने लबाडीने मिळविलेलो अगर चोरीची असण्याची शक्यता असलेची खात्री झालेने सदरची मोटार सायकल जप्त करुन आकाश अरविंद भोले वय २३ वर्षे, रा. अहेरवरेगाव ता. गेवराई जि.बिड याचे विरुद्ध पो. कॉ. जाधव बने ४८ यांनी दिले फिर्यादीवरुन वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु. रजि.नं ४३२/२०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे दाखल केला आहे
सदर गुन्हयाचे तपासात सदरची मोटार सायकल चोरीस गेलेबाबत अंबड पोलीस स्टेशन जि.नाशिक येथे गु.रजि.नं २९८ / २०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २४/६/२०२२ रोजी दाखल असलेबाबत माहिती प्राप्त झालेने अंबड पोलीस स्टेशनला संपर्क करून सदरची जप्त मोटार सायकल व वरील इसम पुढील तपासकामी सदर गुन्हयाचे तपासी अमदलार पो.हवा शिरसाटअंबड पोलीस स्टेशन यांचेकडे वर्ग केले आहेत
सदरची कामगिरी मा. अंकीत गोयल, पोलीस अधिक्षक सो. पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे सो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. सोमनाथ लांडे सहा पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पो. हवा. खेडकर बन १७९७ पो.हवा नागटिळक ब.नं १४५२. पो.ना. भोसले बं.नं. ७१७.पो. कॉ. जाधव बन ४८ पो. कॉ. सागर वाघमोडे यांनी केली आहे.