प्रतिनिधी
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेद्वारे पिंपरी चिंचवडमध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हयातुन एकुण 500 खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात स्पर्धा पार पडलेली आहे.
यामध्ये रायगड जिल्हयाचे प्रतिनिधित्व करत द्राेणा आर्चरी अकादमी कर्नाळा क्लब पनवेल मधील संस्क्रुती पंकज काकडे निंबुत ता.बारामती हिने इंडियन २० मीटर व ३० मीटर व एकत्रित या तीन्हि प्रकारात द्वितीय स्थान पटकावुन एकुण तीन सिल्वर मेडल प्राप्त झालेले असुन पुढिल महिन्यात विजयवाडा आंन्ध्रप्रदेश येथे हाेणार्या आंतरराज्य (National) स्पर्धमध्ये निवड झालेली आहे.तिने यापुर्वी आक्टाेंबर २०२२ मध्ये गुरगांव दिल्ली येथे पार पडलेल्या केन्द्रीय विधालय National स्पर्धत ३० मिटर प्रथम क्रमांक ,२० मीटर द्वितीय क्रमाक घेवुन ,एकत्रित प्रथम क्रमांक मध्ये २ गाेल्ड व १ सिल्वर व राेख रक्कम असे पारीताेषिक प्राप्त झालेले आहे.संस्क्रुती काकडे यांना द्राेणा आर्चरी अकाडमी कर्नाळा स्पाेर्ट क्लबचे मुकेश गुरदाले सर यांनी मार्गदर्शन केले.