• Home
  • माझा जिल्हा
  • योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
Image

योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी वैजनाथ कॉरिडॉर संकल्पनेला पूजाने दिला पाठिंबा, तसेच या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याची दिली ग्वाही

महाराष्ट्र कन्या पूजा तान्हाजी बुधावले ही भगिनी सायकलवर बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास करत आहेत. ‘योग मेरा कर्म, एकता मेरा धर्म’ या संकल्पनेचा प्रचार प्रसार करत पूजा भारत भ्रमण करत आहेत. योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी गुरुवार १५ डिसेंबर रोजी प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर समितीच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी कॉरिडॉरची संकल्पना जाणून घेतली. त्यांनंतर काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल च्या धर्तीवर प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे व त्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगसाधना केंद्र व्हावे अशी ईच्छा यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या प्रवासा दरम्यान त्या आपल्या संकल्पनेला भारतभर नेतील यात शंका नाही.#आस्थाजगाचीअस्मितापरळीवैद्यनाथची ही परळी वैजनाथच्या रहिवाश्यांच्या ‘मन की बात’ भारतभर पोहचवू असे पूजाने सांगितले. परळी वैजनाथमध्ये विविध संघटना आणि संस्थांनी तसेच नागरिकांनी जागोजागी उत्साहाने पूजा बुधावले व त्यांचे सहकारी समीर तळेकर यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती.

*कोण आहेत पूजा बुधावले?*

◆मूळ देहू गांव, जि. पुणे येथील पूजा यांनी २०१७ मध्येही जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. लॉकडाऊनमध्ये स्वतः योगा शिकत व शिकत असताना त्यांना संकल्पना सुचली की भारतातील १२ ज्योतिर्लिंग यात्रा सायकलवर करायची.

◆ त्या अनुषंगाने ऑक्टोबर २०२२ पासून आजवर परळी वैजनाथपर्यंत त्यांनी ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत योग प्रचार प्रसार करत यशस्वीपणे ५००० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. यापुढे त्या औंढा नागनाथ, श्रीशैल्यम मल्लिकार्जुन व रामेश्वर असा जवळपास ३००० किमी चा प्रवास करण्यासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.

◆ ही यात्रा पूर्ण केल्यावर पूजा बुधावले योग प्रसार करत बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकलवर प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला सायकलिस्ट होतील.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026