श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Uncategorized

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळा निंबूत येथील जे लहान विद्यार्थी उपस्थित होते त्यांना विद्यालयाच्या प्रयोगशाळेतील साहित्य व त्यांचा वापर याविषयी प्राथमिक स्वरूपाची सोप्या शब्दात माहिती देऊन विज्ञानाबद्दल गोडी निर्माण केली.
यावेळी इ.९वी तील प्रेमराज भंडलकर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय विज्ञान दिन व डॉ. सी.व्ही.रमण यांच्या विषयी माहिती सांगितली .
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विज्ञान चित्रकला व विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत च्या मुख्याध्यापिका सौ. बालगुडे मॅडम व त्यांच्या सहकारी शेंडकर मॅडम व पालक प्रतिनिधी सौ.स्वातीताई केंजळे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेल्या विज्ञान चित्राकृती त्याचप्रमाणे विज्ञान प्रतिकृती पाहून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. आलेल्या पाहुण्यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष मा .श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.