• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान .
Image

बारामती ! युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग) व मुन्नाभाई बागवान (उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) तसेच फुल अँड फायनल ग्रुप बारामती वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. सावित्रीमाई फुले सभागृहात आयोजित शिबिराला बारामती येथील नागरिकांचा व मित्रमंडळींचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि अनेक रक्तदात्यांनी या पुण्याच्या कार्यात सहभागी होत माणुसकीचे दर्शन घडवत १६१ बाटलीचे संकलन झाले.

शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी बारामतीच्या नगरसेविका आरती शेंडगे (महिला अध्यक्ष बारामती शहर), पैगंबरभाई शेख (अध्यक्ष सोशल मीडिया पुणे जिल्हा), जयकुमार काळे सरचिटणीस पुणे जिल्हा) मनोज केंगार (अध्यक्ष सामाजिक विभाग बारामती शहर), शहाजी काका जाधव (उपाध्यक्ष बारामती शहर) इकबाल शेख (उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्याक विभाग) यांनी रक्तदानाचे महत्व मोजक्या शब्दात मांडले.

सर्व रक्तदात्यांचे योग्य प्रकारे नोंदणी, तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या शिबीरामुळे अनेक गरजू रुग्णांना संजीवनी मिळेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. भविष्यात असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प आम्ही केला आहे असे अस्लम तांबोळी आणि मुन्ना बागवान यांनी सांगितले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025