• Home
  • राजकीय
  • निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.
Image

निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.

 संपादक मधुकर बनसोडे.

 नींबूत ग्रामपंचायत साठी पहिल्यांदाच निवडला जाणार जनतेतून सरपंच

 नींबूत ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही सर्वसाधारण पुरुष झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाची तयारी सुरू केल्याचे चित्र नींबूत इथे दिसत आहे.

 नींबूत गाव हे विकासाचे गाव म्हणून नींबूत गावाची एक वेगळी ओळख आहे. नींबूत गावचे राजकारण तालुक्यापुरते मर्यादित नसून नींबूच्या राजकारणाची  देशभरामध्ये मोठ्या चर्चा होत असतात. नींबूत चे  राजकारण म्हटलं की काकडे आणि पवार ही दोन्ही नावं चर्चेत आल्याशिवाय राहत नाहीत मात्र अलीकडच्या काळामध्ये काकडे व पवार यांच्यातील राजकीय वैरत्व संपत आल्याचे दिसत आहे त्यामुळे नींबूत मधील अनेक गट हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काम करत आहेत मात्र आपल्या गटाकडेच ग्रामपंचायतची सत्ता राहण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.

 या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नींबूत ग्रामपंचायत निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकू पाहिला मिळेल अशा चर्चा नागरिकांमधून होत आहे?

 सरपंच पदाच्या प्रबळ दावेदारांनी आत्तापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेणे त्यांच्या अडचणींवरती मार्ग काढणे सुरू केले आहे.

 मात्र अलीकडच्या काळातील मतदार राजा देखील खूप हुशार झालं आहे त्यामुळे निवडणुकीपुरते विचारपूस करणाऱ्या नेतेमंडळींना मतदार देखील यावेळेस हेलकावणी देणार असल्याची चर्चा स्थानिक मतदारांमधून होत आहे.

 कोणत्या पक्षाने किती समाज कार्य गावासाठी केले आहे कोणत्या नेत्याने किती निधी आत्तापर्यंत गावासाठी आणून खर्च केला याची पडताळणी करूनच मतदार राजा आगामी निवडणुकीमध्ये आपला मताचा कौल देणार असल्याच्या चर्चा नींबूत परिसरातील पारावरती रंगू लागले आहे.

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025