• Home
  • क्राईम
  • भिवंडीत ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, ठाणे पोलिसांची कारवाई
Image

भिवंडीत ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, ठाणे पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी

भिवंडी येथे ३० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरज शेंडे (३२), भारत सासे (३८) आणि स्पप्नील पाटील (३८) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

भिवंडी येथील अवचितपाडा परिसरात काहीजण भारतीय बनावटीचे चलन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने शनिवारी रात्री अवचितपाडा येथे सापळा रचला. अवचितपाडा येथे रिक्षामधून तीन जण बनावट नोटा घेऊन आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे सुरज शेंडे, भारत सासे आणि स्पप्नील पाटील असल्याचे सांगितले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील बॅगेत ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी या नोटा बनावट असल्याची कबूली दिली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026