• Home
  • माझा जिल्हा
  • आदर्श मिलिंद तरुण मंडळ नींबूत यांच्यावतीने दहावी बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.
Image

आदर्श मिलिंद तरुण मंडळ नींबूत यांच्यावतीने दहावी बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

प्रतिनिधी.

नींबूत येथील आदर्श मिलिंद तरुण मंडळ यांच्यावतीने दहावी,बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल सायंकाळी आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
यामध्ये इयत्ता दहावीतील बा,सा.काकडे विद्यालयातील विद्यार्थिनी सानिका लालासो बनसोडे. हिने 90.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
मानसि संतोष माने. या विद्यार्थिनीने 80% मार्क मिळवित द्वितीय क्रमांक पटकावला.
रसिका राजेंद्र खुडे या विद्यार्थिनीने 83.80% मार्क मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.
तर सौरभ महेंद्र बनसोडे, प्रज्वल रवींद्र सोनवणे या विद्यार्थ्यांनी देखील यशाला गवसनी घातली.
वरील पाचही विद्यार्थी.
बाबूलाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय नींबूत येथील आहेत.
तर इयत्ता बारावी मध्ये
प्रेम राहुल काकडे
चैतन्य सतीश बनसोडे.
प्रणव रमेश भोसले.
आदिती नितीन बनसोडे
अनुजा प्रमोद बनसोडे
सानिका संतोष सोनवणे. या विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादित केले
वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी. बा.सा.काकडे विद्यालयाच्या सर्वेसर्वा सुप्रियाताई पाटील, नींबूत ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालिका तेजस्विनीताई प्रिय राज काकडे.
सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत राव काकडे.
बा.सा.काकडे विद्यालयाचे सचिव मदन रावजी काकडे.
बा.सा.काकडे विद्यालयाचे शिक्षक खुडे सर, सूर्यवंशी सर, नींबूत ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, वामन बनसोडे, विलास बनसोडे, सुरेश बनसोडे, अमोल बनसोडे, अशोक बनसोडे, आदर्श मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सदस्य आदी मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयाची अठरा वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राहिली असल्याची भावना व्यक्त करत उपाध्यक्ष सुप्रियाताई पाटील यांनी सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे मनापासून आभार मानले. यावेळी सूत्रसंचालन मधुकर बनसोडे यांनी केले तर आभार योद्धा प्रतिष्ठानचे बारामती तालुका अध्यक्ष अमोल बनसोडे यांनी मानले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025