• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/-प्रति मे.टन तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर जमा करावे. :-श्री सतिश काकडे
Image

सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/-प्रति मे.टन तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर जमा करावे. :-श्री सतिश काकडे

प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ या गळीत हंगामात पहिली उचल २८००/- प्र.मे.टन व उर्वरित F.R.P ३६३/- रू प्र.मे.टन असे एकुण ३१६३/- रू प्र.मे.टन F.R.P सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत, परंतु आत्ता कारखान्याचा गाळप हंगाम संपुण आत्ता दिड महिना झाला आहे त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे. टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे. अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

दोन दिवसांपुर्वी माळेगाव कारखान्याने सन २०२४-२५ या गाळप हंगामाचे खोडकी बील २००/- प्र.मे.टन जाहिर केलेले आहे. माळेगाव कारखान्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सोमेश्वर कारखान्यास उत्कृष्ठ कार्यक्षमता व इतर कारणांसाठी १० ते १२ पुरस्कार मिळालेले आहेत. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये सोमेश्वर कारखान्याने जादा उसाचे गाळप करून उच्चांकी कशिंग, चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये आग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२४-२५ चे खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे. कारण सभासदांना शेतीच्या मशागतीचे कामे, उसाच्या लागणी करणे, खते घेणे तसेच मुला-मुलींची अॅडमिशन घेणे यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने कारखान्याने सभासदांचा विचार करून दि.३१ मे २०२५ पर्यंत खोडकी बील व दुसरे हप्ता सभासदंच्या बँक खात्यावर वर्ग करावा.

तरी सोमेश्वर कारखान्याने मागील काही वर्षांपासुन हंगाम संपल्यानंतर देण्यात येणाऱ्या खोडकी बीलाची परंपरा बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी कृती समितीस सन २०२४-२५ चे खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकूण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे अशी मागणी करावी लागत आहे ही दर्दैवी बाब आहे. व तसा पत्र व्यवहार देखील कारखान्याला केलेला आहे. तरी चेअरमन व संचालक मंडळाने तात्काळ निर्णय घेवुन दि.३१ मे २०२५ पर्यंत सदर रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी अन्यथा कृती समितीस मोर्चा काढावा लागेल याची नोंद घ्यावी व यावेळी काही अनुचीत प्रकार घडल्यास व कारखान्यास आर्थिक तोषिश लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांची राहिल याची नोंद घ्यावी.

उसाचे गाळप झाल्यापासुन १४ दिवसांमध्ये गाळप झालेल्या उसाची FRP रक्कम देणे कायद्याने बंधनकारक असतानाही. कारखान्याने मागील चार गाळप हंगामाची FRP रक्कम विलंबाने दिल्याने त्यावर मिळणाऱ्या व्याजाची मागणी थोड्याच दिवसांमध्ये कृती समिती करणार आहे. कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने मागीतल्या शिवाय द्यायचे नाही असे धोरण अवलंबलेल आहे. एक तर FRP एक रक्कमी द्यायची नाही FRP रक्कमेचे तुकडे करायचे सभासदांचे कोणतेही हीत पाहायचे नाही. त्यामुळे सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ या चार गाळप हंगामामध्ये FRP रक्कम उशिराने दिल्याने त्याचे जवळपास अंदाजे ५ ते ६ कोटी रूपयांच्या वर होणारे व्याजाची रक्कम सभासदांना न्याय हक्काची मिळालीच पाहिजे कारण सभासदांनी या रक्कमेवर सोसायट्या व बँकेची व्याज भरलेली आहे. तसेच चालु वर्षी कोर्टाने देखील FRP एक रक्कमी देणे बाबतचा महत्वाचा निकाल दिलेला आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025