• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! चोपडज ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ; पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन .
Image

बारामती ! चोपडज ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ; पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन .

प्रतिनिधी –

गेल्या अनेक दिवसांपासून वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊनही बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याकारणाने तसेच स्थानिक राजकारणापोटी चोपडज (पांढरवस्ती) येथील भूमिहीन बेघर कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत असल्याकारणाने दिनांक २१ मे रोजी बारामती पंचायत समिती समोर बहुजन समाज पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

या पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ यांनी ग्रामपंचायतीस तोंडी व लेखी पत्र व्यवहार करून कुठलेही प्रकारची दखल घेत नव्हती.गोरगरीब जनतेस वेळोवेळी कागदपत्रे,घरकुल,पाणी, तसेच इतर शासकीय सोयीसुविधांपासून अडवणूक होत असे पिसाळ यांनी सांगितले .

याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.काळुराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा प्रभारी चंद्रकांत खरात यांच्या सहकार्याने बारामती विधानसभा अध्यक्ष मा.दयानंद पिसाळ यांनी बेमुदत आंदोलन केले.परंतु या प्रमुख मागण्या मान्य करीत दुपारी चार वाजता लेखी मागण्या मान्य करून उप गटविकास अधिकारी नंदन जरांडे, विस्ताराधिकारी राजेंद्र चांदगुडे,घरकुल विभाग प्रमुख तसेच इतर प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांकडून बसपा तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ यांना लेखी पत्र देऊन बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा प्रभारी चंद्रकांत खरात,दादा टेकाळे,रोहित लोंढे, श्याम तेलंगे, विजय पिसाळ, भगवान कदम,व ग्रामस्थ गणपत माने,प्रशांत नवले, दत्तात्रय गायकवाड, संजय गाडेकर,यांसह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025