मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 31 May 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 31, 2025 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

पुणे – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याचे ३ जून २०२५ रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी म्हाळुंगे येथे आयोजित करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा परिषद व ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय ग्रामविकास, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या लाभार्थ्यांना महाआवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ‘सर्वांसाठी निवारा’ या संकल्पनेला चालना देणे हा आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख