Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • सुनेला सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाखांची खंडणी उकळली
Image

सुनेला सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाखांची खंडणी उकळली

प्रतिनिधी

सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया वकील महिलेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणीकाळभोर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कडू बाबुराव सातपुते (वय ६३, रा. दाहिगाव, माळी गल्ली, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सातपुते यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन स्नेहल कांबळे हिने त्यांना वकील असल्याचे खाेटे सांगितले. ‘तुमच्या विरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेल्या सुनेपासून साेडचिठ्ठी घेऊन देते,’ असे आमिष दाखवून तिने सातपुते यांच्याकडून वेळाेवेळी रोखीने तसेच बँक खात्यावर मिळून पाच लाख ९४ हजार रुपये घेतले. मात्र, साेडचिठ्ठी मिळवून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पाेलिसांनी सापळा रचून महिलेस खंडणीचे पैसे स्वीकारताना अटक केली, अशी माहिती पाेलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. आरोपी स्नेहल कांबळे विराेधात लाेणीकाळभाेर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले, ‘स्नेहल कांबळे हिने सातपुते यांना तुमच्या सुनेने बलात्कार तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, महिला आयाेगाकडे सासरच्या व्यक्तींविराेधात तक्रार दिली आहे, असे खोटे सांगितले. त्यातून सुटका करून घेण्यासाठी पाेलीस आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही तर तुम्हाला अटक हाेईल, अशी भिती सातपुते यांना घातली. त्यांच्याकडून वेळोवेळी खंडणी स्वरूपात पाच लाख ९४ हजार रुपये खंडणी घेतली.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026