• Home
  • माझा जिल्हा
  • जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ .
Image

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ .

प्रतिनिधी –

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी शुभारंभ होणार आहे. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. एसटीईएम लॅब, संगणक लॅब व कोडींगच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाईल. जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण देण्यात येणार असून परकीय भाषा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जागतिक ज्ञान वाढेल. विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, ज्यामुळे सर्वासाठी समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कळविले आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025