• Home
  • माझा जिल्हा
  • निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वछता संपन्न…
Image

निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वछता संपन्न…

प्रतिनिधी.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी २० जून २०२५ रोजी दोन्ही पालख्या पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे रवाना झाल्या. या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जसजशा पालख्या पुढे सरकत होत्या तसतसे मिशनचे सेवादार पालखी मार्गाची स्वच्छता करत होते. या स्वच्छता अभियानचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे करण्यात आले होते. निरंकारी मिशनचे सेवादार हजारोंच्या संख्येने या अभियानामध्ये सहभागी झाले होते.
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या लोकमंगलकारी व दूरदर्शी नेतृत्वाखाली मिशनच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार वेळोवेळी स्वच्छता अभियानसारखे उपक्रम राबविले जातात.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026