• Home
  • माझा जिल्हा
  • ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान
Image

ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी.

पुणे दिनांक 25 जून 2025

बालगंधर्व रंगमंदिर च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने 24, 25, 26जून रोजी सर्व मराठी कलाकारांचा भव्य सोहळा आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री सहकार आणी नागरी विमान वाहतूक भारत सरकार, प्रशांत दामले, श्रीमती लीला गांधी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून 24जून रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

दिनांक 25 जून रोजी बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे अध्यक्षा श्री मेघराज राजेभोसले व सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांचे हस्ते ॲड. सुप्रिया बर्गे यांना वकिली क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श वकील सन्मान प्रदान करण्यात आला.

ॲड सुप्रिया बर्गे यांना वकिली व्यवसायातील 17 वर्षांचा अनुभव आहे. यशश्री फाउंडेशन च्या माध्यमातून हॅपी मॅरीड लाईफ हे समुपदेशन व मध्यस्थी केंद्र त्या चालवितात. यामध्ये विवाहपूर्व, विवाहानंतर समुपदेशन केले जाते. पतिपत्नी मधील वाद मिटविणे, कुटुंबातील सासू, सासरे, दिर जाऊ, नणंद, सुन, जावई, मुलगी, भाऊ, यांच्यातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे कार्य त्या अनेक वर्ष करीत आहेत. भारतातील कुटुंबसंस्था टिकावी, न्यायालयावरील कौटुंबिक वादाचा अतिरिक्त भार कमी करण्यास मदत ह्यावी, आपल्या कायदेविषयक ज्ञानाचा समाज्याच्या प्रत्येक घटकास उपयोग व्हावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. कायदेविषयक जनजागृतीचे कार्य त्या सातत्याने करीत असतात. घटस्फोटाचे, कुटुंबीक हिंसाचाराचे, बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमीकरण्यासाठी त्या अनेक सामाजिक उपक्रम राबववून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात.

त्यांना दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक कोर्ट केसेस शिताफीने हाताळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. बारामती, पुणे, मुंबई हाय कोर्ट याठिकाणी त्या वकिली व्यवसाय करीत असून त्या पतिपत्नी चे ऑनलाईन कौन्सेलिंग देखील करतात, त्यांना त्यांच्या कार्यास पती ॲड.विशाल बर्गे, व सासरे ॲड.विजयकुमार बर्गे यांचे विशेष सहकार्य लाभते. बर्गे अँड बर्गे असोसिएट या लीगल फर्म च्या माध्यमातून बर्गे परिवाराने हजारो पीडितांना न्याय मिळवून देण्यास मदत केली आहे. वकिली व्यवसायातील उत्कृष्ट कार्यासाठी, विधी व न्याय क्षेत्रातील योगदानासाठी बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांनी ॲड. सुप्रिया बर्गे व ॲड.विशाल बर्गे यांचा भव्य सन्मान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या व हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे केला.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025