प्रतिनिधी –
आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांनी ६० वर्षे पूर्ण झालेल्या आशा स्वयंसेविका यांना कामावरून कमी करण्यात यावे असे परिपत्रक काढण्यात आले आहे . यासंदर्भात लासुर्णे येथील मंगल अंकुश साळुंखे या आशा स्वयंसेविका यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे याठिकाणी सर्व आशा सेविका यांच्यावतीने एकदिवस लक्ष्यनीय उपोषण करण्यात आले आहे . या उपोषणाला सर्व आशा स्वयंसेविका यांच्यावतीने पाठिंबा दर्शविन्यात आला आहे .
यामध्ये उपोषण कर्ते यांची मागणी अशी ..
• आशा स्वयंसेविका हे प्रामाणिक व वेळेत काम करतात व त्यांचे मानधन वेळेवर मिळत नाही तरी त्यांचे थकित मानधन व पुढील मानधन वेळेत मिळावे.
• सर्व आशा सेविका ह्या कोरोना काळात त्यांची व त्यांच्या कुटुंबाची जीवाची पर्वा न करता पूर्ण प्रामाणिक पणे काम केले आहे. यामध्ये आशा सेविका यांचे प्रशासनाच्या विविध माध्यमांतर्फे गौरव देखील करण्यात आला आहे .मात्र आता साठ वर्षीय पुढील अशा सेविकांना कामावरून कमी करण्यात येत आहे यामध्ये जर 60 वर्षीय पुढील आशा सेविकांना काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना काम करण्याची संधी मिळावी.
• आशा स्वयंसेविका यांची निवृत्ती ( रिटायरमेंट) झाल्यानंतर पुढील आयुष्य व्यवस्थित रित्या जगता यावे यासाठी प्रशासनाकडून पेंशन व ग्रॅजुइटी मिळावी.
याप्रमाणे या एक दिवशीय बसलेल्या उपोषणकर्ते आशा स्वयंसेविका यांची मागणी व म्हणणे आहे .