.
प्रतिनिधी –
वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे जातिवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संजय श्रावण साऴवे वय ५३ वर्षे रा. वडगाव निंबाळकर ता.बारामती जिल्हा. पुणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सुरज दरेकर ,शुभम दरेकर ,सौरभ दरेकर ,भुषण दरेकर, ऋषिकेश दरेकर ,ओंकार दरेकर ,राहुल उर्फ बापु दरेकर सर्व रा. वडगाव निंबाऴकर दरेकर मऴा ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि. २९ रोजी रात्री १० वाजता वडगाव निंबाऴकर येथिल इरिकेशन बंगला येथिल अजित भोसले यांचे घराजवऴ आरोपी सुरज दरेकर याने तु महार आमचा वाद मिटवणार का असे म्हणुन जातीवाचक शिवीगाऴ करुन तु तुझी कीतीही घेऊन ये असे म्हणुन हातातील फायटर फिर्यादी संजय साळवे यांच्या उजवे डोऴ्याचे वर मारला त्यावेऴी त्यांचे उजवे डोऴ्याचे वर जखम होवुन रक्त येऊन ते खाली पडले त्यावेऴी फिर्यादी संजय साळवे यांच्या सोबत असणारे सचिन साऴवे हे त्यांना उचलण्याकरीता येत असताना परत फिर्यादी संजय साळवे यांना उर्वरित सर्व आरोपी यांनी हाताने लाथाबुक्याने छातीवर तोंडावर पाठीत मारहाण केली. त्यावेऴी आरोपी राहुल दरेकर हा हातात चाकु घेऊन फिर्यादी साळवे यांच्या अंगावर धावुन आला त्यावेऴी सचिन साळवे याने त्यास बाजुला केले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.