• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! “झाडे लावा झाडे जगवा” चा नारा देत सदोबाचीवाडी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम .
Image

बारामती ! “झाडे लावा झाडे जगवा” चा नारा देत सदोबाचीवाडी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर संचालित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामतीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सादोबाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शैक्षणिक धोरणानुसार सात आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकरी आणि गावांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले .

हा उपक्रम संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्राचार्या जया तिवारी, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुर पिसाळ, प्रा. शिवानी कोकणे देसाई व प्रा. पल्लवी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थी आर्यन अब्दागिरे ,जयदीप जगताप ,अथर्व पाटील, तानाजी ठोंबरे, हरिप्रसाद पानसरे, ओंकार पाटील ,रोहन यादव व सिद्धेश कामठे यांनी सदोबाचिवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ आदी फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी उपसरपंच ऋषिकेश धुमाळ , ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ होळकर , संजय होळकर सर , शिक्षक तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025