बारामती ! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी मध्ये दुर्गंधीच दुर्गंधी ; ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष्य.!

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाचे वडगाव निंबाळकर मधील सर्वच सरकारी कामांवरती दुर्लक्ष्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . यामध्ये वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे तीन ठिकाणी गटर लाइन फुटून २५ दिवस होऊन देखील याचे काम होत नाहीये व हे काम पूर्ण झाले नसताना देखील त्या कामाचे बिल ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढण्यात आल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे ?. यावरून येथील ग्रामस्थांचा संताप्त व्यक्त होताना दिसत आहे .

बंगला झोपडपट्टी येथे हे गटर लाइन फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे . याठिकाणी लहान मुले खेळत असतात गटर लाइन फुटून दुर्गंधी पसरल्याने आजाराचे प्रमाण वाढतानाचे चित्र दिसत आहे . हे गटर लाइनचे काम न करता तसेच मोकळे सोडून दिले आहे यामध्ये कोणाला हाणी झाली तर याला जबाबदार कोण ?.

या गटर लाइन बद्दल वारंवार ग्रामसेवक , व ग्रामपंचायत प्रशासनाला फोन करून माहिती दिली असताना देखील याची दखल घेतली जात नाही. वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये काम पूर्ण झाले नसले तरी बिल काढण्याचे प्रकार सतत होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे . या गटर लाईनची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी बंगला झोपडपट्टी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे .