श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, संचालकांसह दोन ऑडिटर वरती आर्थिक अपहरण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

माझा जिल्हा

 संपादक मधुकर बनसोडे.

श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नींबूत येथे दीड कोटी रुपयांच्या अपहर झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे याप्रकरणी संस्थेचे चेअरमन व संचालकांसह दोन ऑडिटर वरती गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १) राहुल विलासराव काकडे चेअरमन श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नींबूत,

२) रमेश उत्तमराव काकडे, संचालक ३) औदुंबर दिगंबर ननवरे संचालक ४) रामचंद्र मल्हार राव रणवरे, संचालक ५) अविराज बाळासाहेब काकडे संचालक ६) सुवर्णा अभय काकडे संचालिका ७) रोहिणी रतन राव काकडे, संचालिका ८) रतन शंकर बनसोडे ९) शेखर विलास शिंदे प्रमाणित लेखापरीक्षक तालिका क्रमांक १२०५३, १०) राहुल श्रीरंग आदलिंगे प्रमाणित लेखापरीक्षक तालिका क्रमांक ११०२९ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे मध्ये सन 2018, १९, २० च्या दरम्यान साधारण दीड कोटी रुपयांचा अपहार झाला असून संस्थेचे चेअरमन राहुल काकडे व त्यांचे नातेवाईक यांनी पतसंस्थेमधील पैसे है प्रापंचिक खर्चासाठी वापरले असुन त्या मध्ये १२००/- ची काजु कतली तात्या नावे रोख, पाइपलाइन करीता नावे रोख, बालाजी विमान टिकीट नावे रोख, जेसीबी भाडे नावे रोख, अशा स्वरूपाचे साधारण नोंदी आढळून आल्या आहेत. त्याच दरम्यान शासनाने संस्थेचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर राहुल आदलिंगे, शेखर शिंदे यांची नेमणूक केली असताना देखील त्यांनीही संस्थेचे खोटे ऑडिट करून संस्थेमध्ये सर्व व्यवस्थित चालले असल्याबाबतचा खोटा अहवाल शासनाला सादर करुन त्याबाबतची शासनाची माफी देखील मागितली आहे, या सर्व गोष्टीचे पुरावे पोलिसांना मिळाले असुन त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.

 सोमेश्वर परिसरामध्ये जवळपास 20 ते 22 पतसंस्था आहेत या सर्व पतसंस्था चालकांनी पतसंस्थेचा गैरवापर न करता पारदर्शक व प्रामाणिकपणाने  कारभार करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे  काही चुकीच्या गोष्टी अथवा तक्रारी निदर्शनास आल्यास कोणाचीही गयी केली जाणार नाही.सहकारी पतसंस्थेमध्ये गोर गरीब लोक कामगार छोटे व्यवसायिक हे पिग्मी स्वरूपात आपल्या पोटाला चिमटा घेऊन पैसे जमा करत असतात हे पैसे संस्थाचालकांचे नसून ते पैसे या गोरगरीब जनतेचे आहेत हे लक्षात ठेवून सोमेश्वर परीसरातील पतसंस्था चालकांनी आपला कारभार हा प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करावा

 पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे वडगाव निंबाळकर.