दौंड येथे पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.

Uncategorized

प्रतिनिधी-

दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयात येत्या रविवारी ( २० जुलै )भारतीय पत्रकार संघाच्या दौंड विभागातर्फे पदग्रहण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा प्रवक्ते प्रा .दिनेश पवार यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वप्निल शेठ शहा, ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर, अमोल काळे यांसह भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. एस. शेख,कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेशजी गणगे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख, जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे, मामून युनिव्हर्सिटी उझबेकिस्तानचे डेप्युटी डीन डॉ वसीम तांबोळी यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय पत्रकार संघ दौंडचे अध्यक्ष सुभाष कदम तसेच उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर,सचिव योगिता रसाळ, तालुका कार्याध्यक्ष जयदीप बगाडे, जिल्हा संघटक रवींद्र देसाई तसेच कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे प्रा. दिनेश पवार यांनी स्पष्ट केले.