मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 23 July 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

श्री श्रेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे श्रावण मास यात्रा काळातील वाहन पार्किंग लिलाव सालाबाद प्रमाणे विक्रमी बोली 2,92,000 लावून संतोष हाके यांनी घेतला.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 23, 2025 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

सोमेश्वर प्रतिनिधी.
आज 11 वाजता सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया संपन्न झाली.
मगरवाङी गावचे उधोजक हनुमंतराव मगर व संतोष हाके या दोघांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला.
हनुमंतराव मगर यांनी 2,90,000 बोली लावली होती.संतोष हाके यांनी 2,92000 बोली लावून लिलाव घेतला.
यावेळी संतोष हाके यांनी आपल्या अङचणी मांडल्या.तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आस्वासन उपस्थित मान्यवरांनी संतोष हाके यांना दिले.
सोमेश्वर देवस्थान श्रावण यात्रेसाठी सज्ज आहे.
सोमेश्वर देवस्थान विस्वस्त मंङळाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे.
सुसज्ज दर्शन लाईन केली आहे.या कामाची पहाणी उपस्थित मान्यवरांनी केली.
यावेळी करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, उधोजक संतोषराव कोंढाळकर, सुखदेवराव शिंदे अध्यक्ष सोमेश्वर सेवाभावी संस्था, शिवाजीराव शेंङकर सामाजिक कार्यकर्ते, संताजीराव गायकवाड मा.उपसरपंच करंजे,सचिन पाटोळे अध्यक्ष तंटामुक्ती करंजे, मोहनराव भांङवलकर मा चेअरमन देवस्थान ट्रस्ट, बाळासाहेब भांङवलकर, राजेंद्र भांङवलकर, विष्णुपंत दगडे मा.उपसरपंच करंजे,अनंता मोकाशी चेअरमन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, विपूल भांङवलकर सचिव सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच विस्वस्त मंङळ आदी मान्यवर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख