तीव्र महत्वकांक्षामुळेच कारगिल युद्ध जिंकले सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन श्री. जयपाल शिवाजी राजेभोसले मु. सा. काकडे महाविद्यालयात कारगिल युद्धातील अनुभव आणि भारताची संरक्षण सिद्धता* या कार्यक्रमाचे आयोजन

Uncategorized

प्रतिनिधी.

सोमेश्वर नगर: येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आजी माजी सैनिकांचा सन्मान केला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. या निमित्ताने कारगिल योद्धे श्री. जयपाल शिवाजी राजेभोसले, श्री. अनिल शिंदे, श्री. प्रशांत शेंडकर, श्री. विजय गोलांडे, संदीप बापुराव सावंत आधी आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री राजेभोसले यांनी सांगितले की, जगातील उंच रणभूमीवर वजा ३० अंश सेल्सिअस तापमानाला भारतीय सैनिक लढले. २६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिल युद्धात लष्करी इतिहासातील सर्वात आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून हा विजय मिळवला. पाकिस्तानी १९७१ च्या सिमला कराराचा भंग करून भारतावर कारगिल युद्ध लादले सशस्त्र सेनेच्या सहाय्याने हा विजय प्राप्त केला. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपण युद्धात सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो.
प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी भारतावर यापूर्वी अनेक वेळा युद्ध लादले पण भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सैनिकांच्या बद्दल आदर असला पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. कल्याणी जगताप, श्री. विक्रम धुर्वे, प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले तर प्रा. राहुल गोलांडे यांनीआभार व्यक्त केले.