श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे शिवणकाम कार्यशाळा संपन्न…

Uncategorized

प्रतिनिधी.
विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व जीवनकौशल्यांचा विकास घडवण्यासाठी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबूत येथे दि. २६ जुलै २०२५ रोजी शिवणकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या मूलभूत कौशल्यांची माहिती देणे आणि त्यांना स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे हा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना शिवणकामासारख्या कौशल्याचे महत्त्व समजावले गेले.
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बटण लावणे, साधे टाके टाकणे, शिवणकामाची सुरुवात कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन काही शिकण्याचा उत्साह दाखवला आणि अनेकांनी स्वतः कापडाच्या छोट्या पिशव्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या, काहींनी बटण लावण्याचा प्रयत्न केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली ननवरे यांनी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या सौ.ज्योतीताई लकडे व सौ.ज्योतीताई गायकवाड यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात शिवणकाम हे केवळ सुई-धाग्याचे काम नाही, तर ते आत्मनिर्भरतेचे, कलात्मकतेचे आणि आत्मविश्वासाचे काम आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
विद्यालयामार्फत यापूर्वीही भाजी निवड कार्यशाळा, वह्या पुस्तके बाईंडिंग करणे आदी उपक्रम घेण्यात आले असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा विद्यालयाचा मानस आहे.
विद्यालयातील या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैया काकडे दे.उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई पाटील व मा. श्री.भीमराव बनसोडे सर तसेच मानद सचिव मा.श्री. मदनराव काकडे दे. यांनी केले.