• Home
  • माझा जिल्हा
  • कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी
Image

कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी

पुणे, दि. 30: मानवी आयुष्यासाठी मधमाशांचे उपयुक्तता लक्षात घेता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मधमाशी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसह आत्मनिर्भर होण्यासही मदत होत आहे, या व्यवसायाकरिता कृषी विभागाच्यावतीने सर्वतोत्परी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी प्रशिक्षणसत्राच्या उद्धाटनप्रसंगी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय बारामतीतर्फे आयोजित सात दिवसांचे निवासी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण तालुका फळरोप वाटिका बारामती कन्हेरी येथे संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हेमंतकुमार डूमरे, राहुल काळे, उप कृषि अधिकारी प्रतापसिंह शिंदे बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रशांत गावडे, अल्पेश वाघ यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.मधुमक्षिका पालन प्रशिक्षण 21 ते 28 जुलै 2025 या कालावधी आयोजित प्रशिक्षणाचा काटेवाडी, देऊळगाव रसाळ, पिंपळी, कटफळ व जैनकवाडी येथील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवून मधुमक्षिका पालनविषयी तांत्रिक मार्गदर्शन घेतले.

या प्रशिक्षणादरम्यान श्री. डूमरे यांनी मधमाशी पालन-शेतीपूरक व्यवसाय, मधमाशी पालनाचे मुलतत्व, पिक उत्पादन वाढीमध्ये मधमाशीचे महत्व, शाश्वत शेतीमध्ये परागीभवनाकरिता मधमाशीची भूमिका, मधमाशी हंगामी व्यवस्थापन, दर्जेदार राणीपालन तंत्रज्ञान, डंख विरहित मधमाशी पालन तसेच मधमाशी वसाहतीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आदी विषयावर चलचित्रफितीच्या तसेच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अभ्यास दौऱ्यावेळी संस्थेचे श्री. काळे यांनी प्रशिक्षणार्थीना मधमाशी पालनाकरिता लागणाऱ्या सामुग्रींची ओळख, शुद्ध मध तयार करण्याची प्रक्रिया प्रात्याक्षिके, मध संकलन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले. श्री. वाघ यांनी मधमाशीच्या विविध प्रजाती व त्यांचा जीवनक्रम तसेच मधमाशी हाताळणी, परिसरात घ्यावयाची पिके याविषयी मार्गदर्शन केले. श्री. शिंदे ‘यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीच्या शंका निरसन करण्यात आले.

मध उत्पादक व्यावसायिक रोहन शेळके व तुषार बंडगर यांनी मध व्यवसाय, व्यवसायातील अडचणीं तसेच शासकीय अनुदान प्रक्रिया, मधापासून उत्पादित होणाऱ्या पदार्थांविषयी मार्गदर्शन केले. श्री. चौधरी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025