• Home
  • इतर
  • बारामती. बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ संपन्न.
Image

बारामती. बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ संपन्न.

प्रतिनिधी

बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेला सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.बहुजन समाजसेवा संघ करंजे अध्यक्ष मेजर पोपटराव हूबरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती कोतवाल संघटनेचे सल्लागार तानाजीराव जाधव होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना करंजे गावचे माजी उपसरपंच रविंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.बहुजन समाजसेवा संघाच्या मार्फत अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुजन समाजसेवा संघ मार्फत चालवण्यात येत आसलेल्या स्पर्धा परिक्षा वाचनालयात विध्यार्थी ज्ञानाचे धडे घेत आहेत. सुंदर आसा छान उपक्रम राबविला जातो. त्याबद्दल संस्थेचे गौरउदगार काढले.यावेळी नवनिर्वाचित वाघळवाङी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर कांबळे सोरटेवाङी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शेंङकर करंजे ग्रामपंचायत सदस्य अतुल गायकवाड भगवानदादा सोसायटी संचालक नानासाहेब दगडे समाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर अनिल हूंबरे विरसेन हूंबरे भगवान भगत पांडुरंग हूंबरे शामराव पाटोळे दादा धुमाळ व स्पर्धा परिक्षा वाचनालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.

तानाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाची खंत व्यक्त केली.कोणताही कार्यक्रम आयोजित करते वेळी दोन दिवस आगोदर निमंत्रित पाहुणे मंडळींना निरोप गेला पाहीजे.एकाकी कार्यक्रम आयोजित करू नयेत.या सामाजिक उपक्रमाला माझा पाठींबा संस्थेला सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.शिवाजी शेंङकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.विखुरलेला बहुजन समाज जाती पातीत बाटला गेला आहे.हे कुठे तरी थांबले पाहीजे.समाजिक उपक्रम राबवित आसताना सर्वाना बरोबर घेऊन चालले पाहीजे.

बहुजन समाजसेवा संघाने चालवलेल्या उपक्रमाला पाठींबा दिला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविंद्र गायकवाड यांनी केले आभार विरसेन हूंबरे यांनी मानले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025