प्रतिनिधी
मा. तालुका कृषि अधिकारी सचिन हाके , मा. गट विकास अधिकारी किशोर माने , मा. सरपंच सौं. गीतांजली जगताप यांच्या हस्थे दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला. या वेळी रणजित जगताप यांच्या शेतावर लागवड करण्यात आली. या योजनेतर्गत वानेवाडी येथे 100 शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या बांधवार नारळ लागवड करण्यात येणार आहे. 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ही योजना वानेवाडी व मुरूम या दोन गावामद्धे राबविण्यात येत आहे. या वेळी मंडळ कृषि अधिकारी आप्पासाहेब झंजे, उप कृषि अधिकारी प्रवीण माने, ग्राम विकास अधिकारी विजय चव्हाण, तांत्रिक अधिकारी राहुल करचे, तांत्रिक अधिकारी सचिन वाघमोडे,सहाय्यक कृषि अधिकारी प्रियांका मदने व शेतकरी उपस्थित होते.