प्रतिनिधी.
डोरलेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सुप्रियाताई नाळे यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर गावातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपनाचा कार्यक्रम झालेनंतर ग्रामपंचायत कार्यालयात सर्व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील कार्याचा व खडतर परिस्थितीतही शाळा शिकून अनेक चळवळीमध्ये भाग घेतल्याचा उल्लेख करुन त्यांना अभिवादन केले.यावेळी मा.उपसरपंच शहाजीराव दळवी,एडव्होकेट -पंढरीनाथ नाळे यांची भाषणे झाली.तसेच यावेळी उपसरपंच सुनील म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अविनाश काळकुटे, ग्रामविकास अधिकारी मानेसाहेब, ग्रामपंचायत सदस्य बापुराव निलाखे ,ग्रा.पं.सदस्य दिलीप नवले, अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष न्यामतुल्ला शेख, सामाजिक कार्यकर्ते बापुराव गवळी, कांतीलाल काळकुटे आणि हनुमंत मदने उपस्थित होते. लोकशाहीर साहित्यरत्न कादंबरीकार अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अनुग्रहण करण्याचा संदेश देत एक वेगळी जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्याचा सामाजिक संदेश दिला यावेळी महादेव नेवसे यांनी ग्रामस्थांचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केलें.
