लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

Uncategorized

निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत यांच्या वतीने दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी असणाऱ्या लोकनेते कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे १ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन विद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला.
या वर्षी सलग आठव्या वर्षी आयोजित झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटातील एकूण१०२विद्यार्थ्यांनी बारामती तालुक्यातील विविध शाळांतून सहभाग घेतला.
स्पर्धेची सुरुवात कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले.
त्या म्हणाल्या, “बाबांचे संपूर्ण जीवन हे समाजासाठी वाहिलेलं होतं. शिक्षण, सहकार, माणुसकी हे त्यांच्या कार्याचे मुख्य आधारस्तंभ होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख हे होते.
आपल्या भाषणात त्यांनी बाबांच्या जीवनातील निरपेक्ष सेवा, शिक्षणप्रेम व सहकार दृष्टिकोन यांचा उल्लेख करत, “आजच्या पिढीने वक्तृत्वाच्या माध्यमातून बाबांच्या विचारांना पुढे नेणं, हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे सांगितले.
प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदासजी वायदंडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या भाषणकलेचं कौतुक करत सांगितले की, “स्पर्धा म्हणजे फक्त बक्षीस नव्हे, ती व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा आहे.” तसेच वक्तृत्व कला ही व्यक्तीला नेतृत्व बहाल करते असेही ते म्हणाले.
तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री. भीमराव बनसोडे यांनी बाबांच्या कार्यकर्तृत्वाचे अनुभवपूर्वक वर्णन करत सांगितले की, “बाबांनी जे मूल्यमंत्र दिले, तेच आजच्या काळातील दिशादर्शक आहेत.”
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, पालक, विविध शाळांचे स्पर्धक व त्यांचे शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
🏅 *लहान गट – विजेते स्पर्धक:*

*प्रथम* – कु.साक्षी संजय जगताप
(नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे.)

*द्वितीय* – कु. जिया फिरोज तांबोळी
(न्यू इंग्लिश स्कूल विद्याप्रतिष्ठान, बारामती)

*तृतीय* – कु.सिद्धी सोनबा जाधव
(विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर)

*उत्तेजनार्थ* – कु.संस्कृती विजय चव्हाण
(न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी)

🏅 *मोठा गट – विजेते स्पर्धक:*

*प्रथम*- कु.सानिका नितीन गाडेकर
(न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती)

*द्वितीय*- कु.ऋतुजा मधुकर बनसोडे
(श्री बा.सा.काकडे देशमुख विद्यालय निंबुत )

*तृतीय*- कु.गुरुत्वर्षा प्रशांत शेलार
(एम. ई.एस. हायस्कूल, बारामती.)

*उत्तेजनार्थ*- स्वानंद राजू तोरणे
(विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यम शाळा विद्यानगरी बारामती)

विजेत्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह रोख रक्कम व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथन व समाजभान रुजल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.सुप्रियाताई पाटील व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे देशमुख यांच्याकडून कौतुक व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.